Shirur : भाजपच्या शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Shirur) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखांची घोषणा केली. त्यामध्ये लांडगे यांना शिरुरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा मतदार संघ दौऱ्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, प्रल्हादसिंह पटेल यांनी गेल्या वर्षभरात शिरूर लोकसभा मतदार संघात दौरे केले आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये लांडगे सक्रीयपणे सहभागी होते.

आमदार लांडगे म्हणाले की, शिरुर लोकसभा मतदार संघातील भोसरी, खेड, जुन्नर, आंबेगाव, मंचर आणि हडपसर या सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. केंद्र सरकारच्या (Shirur) माध्यमातून मतदार संघातील पुणे-नाशिक महामार्ग, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, रेल्वे महामार्ग यांच्यासह विविध प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. ग्रामीण आणि शहरी असा मतदार निश्चितपणे विकासाच्या मुद्यांवर भाजपासोबत आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे निभावणार असून, पक्षाने दिलेल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे.

विधानसभा निवडणूक प्रमुखपदी डोळस, बारणे, गोरखे – 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी केली असून, विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातून माजी नगरसेवक विकास डोळस, चिंचवड विधानसभा मतदार संघातून काळूराम बारणे आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातून अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघांचे प्रमुख पुढीलप्रमाणे :

मावळ – प्रशांत ठाकूर
पुणे – मुरलीधर मोहोळ.
बारामती- राहुल कुल
माढा- प्रशांत परिचारक
सातारा- अतुल भोसले
सांगली- दिपक शिंदे
हातकणंगले- सत्यजित देशमुख
कोल्हापूर- धनंजय महाडिक

Pune : पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.