shirur : राऊतवाडी येथे शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

Blood donation camp organized at Rautwadi on Saturday

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिरूर तालुका यांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी (शनिवारी) राऊतवाडी ( ता. शिरूर ) येथे सावतामाळी मित्र मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राऊतवाडी येथील सावतामाळी मंदिरात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण रक्तदान करीत नाहीत, तर बहुतांशी प्रमाणात रक्तदान शिबिरही घेण्यात येत नाही. परिणामी गरजू रुग्णांना कोरोनाच्या आपत्तीत वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही.

हा विचार करता सामाजिक बंधिलकीतून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन तानाजी राऊत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.