Shirur : कारच्या भीषण अपघातात नवजात बालकासह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- ट्रेलर आणि कार यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका 20 दिवसाच्या नवजात बालकाचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी रात्री पुणे-नगर महामार्गावर शिरूर येथे झाला.

लिंबाजी माधव हाके (वय 25 ), किशोर माधव हाके (वय 32), विमलाबाई माधव हाके (वय 60) आणि नवजात पुरुष जातीचे अर्भक सर्व राहणार वाघोली मूळ रा रामतीर्थ, ता. लोह, जि . नांदेड ) अशी मृतांची नावे असून पुष्पा किशोर हाके (वय 25), समृद्धी बजरंग हुलंगडे (वय 4) अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हाके कुटुंबीय वाघोली येथे राहतात. स्वाती किशोर हाके यांची 20 दिवसापुर्वी प्रसूती झाली होती शनिवारी (दि. 21) औरंगाबादहुन पुण्याला हाके कुटुंबीय वॅग्नर कारमधून (एम एच क्यु डब्ल्यू 8502) पुण्याला निघाले. शिरुर शहराबाहेरुन जाणाऱ्या पुणे नगर बायपास रस्त्याने जात असताना पाचर्णे मळाच्या चढाजवळ रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या ट्रेलरला (आर जे 05 जे बी 2433) पाठीमागुन धडकली. हा अपघात इतका भीषण होता गाडीतील चार जण जागीच मृत्युमुखी पडले. इतर वाहनाचा मदतीने पोलिसांनी अडकलेली कार बाहेर काढली .

या भीषण अपघातातून हाके यांची चार वर्षाची भाची समृद्धी बजरंग हलगुडे ही सुखरुप बचावली तीला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.