Shirur Crime News: लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावात हा प्रकार घडला. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल राजेंद्र सुपेकर (रा. सुपेकरवाडी, कुळधरण, ता. कर्जत, जि. नगर) तसेच त्याला मदत करणारे राजेंद्र बबन सुपेकर व संतोष बबन सुपेकर (दोघे रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. नगर) अशी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सरदवाडी येथे ही महिला अनेक दिवसांपासून कुटुंबीय सोबत राहत होती. तिने पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला आहे. दरम्यान रांजणगाव एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करत असताना 2014 साली तिची ओळख अनिल सुपेकर याच्यासोबत झाली होती.

त्याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत राहू लागला. या कालावधीत त्याने वारंवार फिर्यादी महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली. आरोपीने पीडित महिलेला हा गर्भ पाडण्यास भाग पाडले आणि त्यानंतर लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला.

दरम्यान एके दिवशी आरोपी फिर्यादी महिलेचे एटीएम कार्ड, सोन्याचे दागिने घेऊन निघून गेला. त्यानंतर त्याने एप्रिल 2021 रोजी गावाकडे जाऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याची माहिती पीडितेला माहिती मिळाली. फिर्यादीने आरोपीला फोन करून विचारणा केली असता त्याने हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित आरोपीला आरोपीला अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एपीआय उंदरे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.