Shirur Crime News : IPL वर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज – दुबई येथे सुरु असणाऱ्या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर शिरूर येथे ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.9) कारवाई केली आहे.

याप्रकरणी राहुल गोरख घोडके (रा. शिरूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल घोडके हा शिरूर येथील राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल या संघात खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. छापा टाकल्यावर आरोपी बेटिंगचे साहित्य तिथेच सोडून पसार झाला.

या ठिकाणावरून एक इंटेक्स कंपनीचा एलसीडी टीव्ही, विवो कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम रुपये 12 हजार 280, दोन फुलस्केप रजिस्टर, एक सेट टॉप बॉक्स असा एकूण 73 हजार 505 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, बारामती अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी धस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, अमोल गोरे, दयानंद लिम्हण, रौफ इनामदार, जनार्दन शेळके, राजू मोमीन, पूनम कांबळे व अक्षय जावळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.