Shirur Crime News: मैत्रिणीच्या मित्राने केलेल्या चाकू हल्ल्यात तीन तरुणी जखमी

एमपीसी न्यूज – शिरूरमध्ये एका तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात तीन तरुणी किरकोळ जखमी झाल्या. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका तरुणीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी तिच्या काही मैत्रिणी वाढदिवसासाठी शिरूर अमरधाम या ठिकाणी एका मैत्रिणीच्या घरी गेल्या होत्या. तेथून परत येत असताना मैत्रिणीच्या एका मित्राने तिघांवर चाकू हल्ला केला यामध्ये त्या सर्व किरकोळ जखमी झाले आहेत.

शिरूर पोलिसांनी प्रसाद लोंढे नामक तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद लोंढे हा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील रहिवासी आहे. तिथून शिरूर अमरधाम या ठिकाणी येऊन त्याने मित्रांसह हा प्रकार केला. त्याने नेमका हा प्रकार का केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक खानापुरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.