Shirur Crime News : शिक्रापुरात भैरवनाथाच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील भैरवनाथाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या पळवून नेल्या आहेत. मंदिरातील पुजाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी मंदिर उघडले असता हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी मंदिर समितीचे अध्यक्ष कांताराम गिलबिले यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी विरोधात शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या पुजार्‍याने शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे मंदिर बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मंदिरात पुजेसाठी आले असताना त्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता दर्शनी भागात असणाऱ्या दोन दानपेट्या जागेवर नव्हत्या.

नंतर त्यांनी बाहेर येउन पहिले असता मंदिराशेजारी कुलूप तोडण्यासाठी वापरलेली सळई दिसून आली.

दरम्यान या दानपेट्यामध्ये नेमकी किती रक्कम होती याची माहिती अद्याप मिळाली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.

शिक्रापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.