Shirur : डॉक्टर, अभिनेता, नेता अन्‌ आता खासदार

एमपीसी न्यूज – शेतकरी कुटुंबातील जन्म, डॉक्टरेटचा अभ्यासक्रमपूर्ण करुन अभिनय क्षेत्रात आपसा ठसा उमठविला. चित्रपटात काम करत असताना राजकारणात प्रवेश केला. उपनेतेपद मिळाले आता शिरुरची खासदारकी भूषविण्याचा मान डॉ. अमोल कोल्हे यांना मिळाला आहे. अभिनेता म्हणून त्यांनी लोकांच्या मनावर गारूड केले. आता नेता आणि खासदार म्हणून जनतेच्या मनावर देखील डॉ. कोल्हे गारुड निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिवसेनेकडून तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव करत डॉ. अमोल कोल्हे जाइंट किलर ठरले आहेत. कोल्हे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला.

  • डॉ. अमोल कोल्हे यांनी 2014 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी स्टार प्रचारक म्हणून राज्यभर प्रचार केला होता. मनसेकडून त्यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी तिकीटाची ऑफर होती. मात्र, ती त्यांनी नाकारली. तसे झाले असले तर 2014 मध्येच कोल्हे विरुद्ध आढळराव सामना पहायला मिळाला असता. शिवसेनेचे ते जिल्हा संपर्क प्रमुख देखील होते.

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत 15 वर्षांपासून पराभूत होणा-या जागेवर मोठा विजय मिळविला.

  • सलग तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव केला. डॉक्टर, अभिनेता, नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले. अभिनेता म्हणून त्यांनी लोकांच्या मनावर गारूड केले. आता नेता आणि खासदार म्हणून जनतेच्या मनावर देखील डॉ. कोल्हे गारुड निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.