Shirur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आढळरावांना निवडून द्या – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज – लोकसभेची निवडणूक देशाची आहे. देश सक्षम हातात असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी कामगारांना केले.

शिरुर लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत सय्यद बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघात बांधकाम कामगार व असंघटीत क्षेत्रातील कामगार यांच्या भेटी-गाठी, कोपरा सभा सय्यद घेत आहेत. आढळराव यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करत आहेत. यावेळी युवासेनेचे सचिन सानप, शिवसेना विभागप्रमुख प्रदीप सपकाळ, शाखाप्रमुख दीपक साळुंके, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड ही कामगारनगरी आहे. अनेक असंघटीत-संघटीत कामगार शहरात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी स्थायिक झाले आहे. या कामगारांनी लोकशाहीचा या उत्सवात सहभागी व्हावे. आपला मतदानाचा हक्क बजावावा. शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणणाचे आहे. त्यासाठी धनुष्यबाणाच्या चित्रासमोरील बटन दाबुन खासदारांना पुन्हा आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहन इरफान सय्यद यांनी केले.

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सभासद असणा-या या कामगारांनी ‘आमचा नेता आमची ताकद’ हा नारा देत खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन विजयश्री खेचून आणण्याची ग्वाही दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like