BNR-HDR-TOP-Mobile

Shirur : माथेफिरूकडून दोन जैन मुनींना जबर मारहाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- दोन जैन मुनींना एका माथेफिरूकडून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना शिरूर भीमाशंकर रस्त्यावर मुंजाळवाडी (कवठे येमाई) येथे घडली. या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

या मारहाणीत गणीवर्य सिद्धसेन विजयजी महाराज व मुनी भव्यघोष विजयजी महाराज जखमी झाले आहेत. अर्जुन सदाशिव हिलाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शिरूर येथुन निघालेले पाच जैनमुनी हे शिरूर भिमाशंकर रस्त्याने जात होते. त्यावेळी मुंजाळवाडी (कवठे येमाई) येथे अर्जुन हिलाळ या माथेफिरूने त्यांना जबर मारहाण केली. त्याच वेळी येथुन जाणारे सागर मुखेकर यांनी साधुना मदत करीत मारहाण करणाऱ्या अर्जुनला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.

त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. जैन मुनींवर कवठे येमाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिरूर, मंचर येथुन घटनास्थळी मोठया संख्येने जैन बांधव जमा झाले. शिरूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असुन, लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.