BNR-HDR-TOP-Mobile

Shirur : कल्पना आढळराव यांनी साधला नागरिकांशी संवाद

एमपीसी न्यूज – भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील यांनी आज प्रचार दौऱ्यानिमित्त ओटा स्कीम परिसराला भेट दिली.

परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, सतीश भांडेकर, सोनम राऊत, अभिजीत जाधव, राधा पुंडे, सतीश उजगरे, सनी भांडेकर, वनिता भांडेकर, मंगल बंदपट्टे, सिकंदर हिरनाईक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्पना आढळराव यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार आढळराव प्रयत्नशील आहेत. तसेच त्यांनी परिसरात विविध विकासकामे केली आहेत. त्या विकासकामांच्या जोरावर आपण आढळराव यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहनही कल्पना आढळराव यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3