Shirur : कुंभार समाजाचा खासदार आढळराव यांना पाठिंबा जाहीर

एमपीसी न्यूज – कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे जिल्हा यांच्यावतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे जिल्हा या संघटनेचे अध्यक्ष संतोष कुंभार, कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजप-शिवसेना सरकारच्या काळात गोरगरिब व दलित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचे महत्त्वाचे कार्य होत आहे. संत गोरोबाकाका मातीकला बोर्डाची स्थापना करून दहा कोटी निधीची तरतूदही सरकारने केली आहे. तसेच एन. टी. आरक्षणाची कुंभार समाजाची मागणी पूर्ण करण्याचे आश्‍वासन राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात दिले आहे. त्यामुळे कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे जिल्हा यांच्यावतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वास देशाचा विकास होत आहे. त्यांच्या राजवटीत देशाने प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या निर्णयाला आधीन राहून महाराष्ट्रातील 80 लाख समाजबांधवाचा शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा जाहीर करीत आहोत. तर पुणे जिल्ह्यात सर्व मतदारसंघात कुंभार समाजावतीने बिनर्शत पाठिंबा दिल्याचे या पत्रकात नमूद केले आहे. या पत्रकावर खेड तालुका अध्यक्ष उद्धव कुंभार, आंबेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र सोमवंशी, जुन्नर तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्याही सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like