Shirur : शेतात काम करत असताना वीज कोसळली; तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : शेतात काम करत असताना (Shirur) अचानक पाऊस आल्याने वीज कोसळल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. शिरूर तालुक्यातील सादलगाव येथे काल दुपारी (28 ऑक्टोबर) दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रिता सिताराम नाईक (वय 16 वर्षे, मूळ राहणार आडशी, जि. नंदूरबार) असे या तरुणीचे नाव आहे. तर, या तरुणीची बहीण गीता राजेश वळवी जखमी झाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत रिता आपल्या बहिणीसह शेतात गेली होती. यावेळी शेतात ऊस तोडणी सुरू असताना पाऊस सुरू झाला होता. पाऊस पडत असताना या दोघी बहिणी उसाच्या फडातून ट्रॅक्टर कसा येईना हे पाहण्यासाठी रस्त्यावर आल्या होत्या. यावेळी या दोघींवर वीज पडली. यात रीता व गीता या दोघी बहिणी बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी रीताला मृत घोषित केले. तर, बेशुद्धावस्थेतील गीता हीला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात पाठवले.

गीता हीची प्रकृती गंभीर असल्याचे वरद विनायक हॉस्पिटलचे (Shirur) संचालक डॉ. सुनील पवार यांनी सांगितले. मृत रीता हीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Crime News : फेसबुक ओळख झालेल्या वकिलाचा तरुणावर अनैसर्गिक अत्याचार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.