Shirur Loksabha Election : शिरूरमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत 14.51 टक्के मतदान 

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान सुरू ( Shirur Loksabha Election ) आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात 4.97 टक्के मतदान झाले. तर अकरा वाजेपर्यंत ही टक्केवारी वाढून 14.51 एवढी झाली.

जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. त्यामध्ये हडपसर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक पाच लाख 81 हजार 904 मतदार आहेत. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात पाच लाख 51 हजार 582 मतदार आहेत. शिरूर विधानसभा मतदारसंघात चार लाख 39 हजार 276 मतदार आहेत. खेड आळंदी मध्ये तीन लाख 52 हजार 634, आंबेगाव मध्ये तीन लाख 2 हजार 101 तर जुन्नर विधानसभा मतदार संघात तीन लाख 12 हजार 205 मतदार आहेत.

Maval LokSabha Election 2024 : मावळमध्ये चार तासात 14.87  टक्के मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत

जुन्नर विधानसभा मतदारसंघ – 5.49 टक्के

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ – 6.64 टक्के

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ – 4.63 टक्के

शिरूर विधानसभा मतदारसंघ – 4.32 टक्के

भोसरी विधानसभा मतदारसंघ – 4.21 टक्के

हडपसर विधानसभा मतदारसंघ – 5.23 टक्के

एकूण – 4.97 टक्के

सकाळी 11 वाजेपर्यंत

जुन्नर विधानसभा मतदारसंघ –  17.06 टक्के

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ – 18.47 टक्के

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ – 14.54 टक्के

शिरूर विधानसभा मतदारसंघ – 12.25 टक्के

भोसरी विधानसभा मतदारसंघ – 12.79 टक्के

हडपसर विधानसभा मतदारसंघ – 14.4 टक्के

एकूण – 14.51 टक्के

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.