Shirur Loksabha Election : शिरूरमध्ये पहिल्या दोन तासात पाच टक्के मतदान 

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान सुरू ( Shirur Loksabha Election) आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात 4.97 टक्के मतदान झाले.

 

जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. त्यामध्ये हडपसर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक पाच लाख 81 हजार 904 मतदार आहेत. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात पाच लाख 51 हजार 582 मतदार आहेत. शिरूर विधानसभा मतदारसंघात चार लाख 39 हजार 276 मतदार आहेत. खेड आळंदी मध्ये तीन लाख 52 हजार 634, आंबेगाव मध्ये तीन लाख 2 हजार 101 तर जुन्नर विधानसभा मतदार संघात तीन लाख 12 हजार 205 मतदार आहेत.

 

Maval LokSabha Election 2024 : मावळमध्ये 24 बॅलेट युनिट बदलले

 

यामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात (सकाळी सात ते नऊ) सर्वाधिक 6.64 टक्के मतदान झाले. त्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघात 5.49 टक्के, हडपसर मध्ये 5.23 टक्के, खेड आळंदी मध्ये 4.63 टक्के, शिरूर मध्ये 4.32 टक्के तर भोसरी मध्ये 4.21 टक्के मतदान झाले आहे.

 

भारतीय हवामान विभागाने सोमवारी ढगाळ वातावरण राहण्याची तसेच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सकाळपासून हवेत गारठा असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे याचा मतदानावर परिणाम होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात ( Shirur Loksabha Election)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.