Shirur Loksabha Election : शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात; 25 लाख 39 हजार मतदार करणार मतदान 

एमपीसी न्यूज – देशात चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी (दि. 13) सुरू झाले ( Shirur Loksabha Election) आहे. देशातील 96 तर राज्यातील 11 मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे. आढळराव पाटील यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी महायुतीकडून कंबर कसली होती. तर डॉ. अमोल कोल्हे यांना सलग दुसऱ्यांदा संसदेत पाठवण्यासाठी महाविकास आघाडी कडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील 25 लाख 39 हजार मतदार आज मतदान करणार आहेत.

Maval LokSabha Election 2024 : मावळमध्ये मतदानाला सुरुवात; 26 लाख मतदार हक्क बजाविणार

भारतीय हवामान विभागाने सोमवारी ढगाळ वातावरण राहण्याची तसेच पाऊस पडण्याची ( Shirur Loksabha Election) शक्यता वर्तवली आहे. सकाळपासून हवेत गारठा असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे याचा मतदानावर परिणाम होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो.

2 हजार 509 मतदान केंद्रांवर मतदान

शिरुर लोकसभा मतदारसंघात 2 हजार 509 मतदान केंद्रे असून यामध्ये 1 हजार 189 मतदान केंद्र शहरी भागात तर 1 हजार 320 मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. 480 ठिकाणी एकल मतदान केंद्र, 222 ठिकाणी दोन मतदान केंद्र, 87 ठिकाणी तीन मतदान केंद्र, 59 ठिकाणी चार मतदान केंद्र, 36 ठिकाणी पाच मतदान केंद्र, 27 ठिकाणी सहा मतदान केंद्र तर 70 ठिकाणी सहापेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत.जुन्नर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 356 मतदान केंद्र, आंबेगांव 338 मतदान केंद्र आणि 2 सहाय्यकारी मतदान केंद्र. खेड आळंदी 385 मतदान केंद्र, शिरुर 405 मतदान केंद्र आणि 34 सहाय्यकारी मतदान केंद्र, भोसरी 464 मतदान केंद्र आणि 4 सहाय्यकारी मतदान केंद्र, तर हडपसर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 494 मतदान केंद्र आणि 27 सहाय्यकारी मतदान ( Shirur Loksabha Election) केंद्र आहेत.

1 हजार 268 मतदान केंद्रांचे वेबकास्टींग

शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 1 हजार 268 मतदान केंद्रांचे वेबकास्टींग करण्यात येत आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर सुरु असलेल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे. यामध्ये जुन्नर 179, आंबेगाव 180, खेड आळंदी 193, शिरुर 220, भोसरी 235 आणि हडपसर 261 मतदान केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या नियंत्रण कक्षातून या यंत्रणेद्वारे मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवत आहेत.

शिरुर लोकसभा मतदार संघात 25 लाख 39 हजार मतदार

शिरुर लोकसभा मतदारसंघात 25 लाख 39 हजार 702 मतदार आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 12 हजार 205, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 3 लाख 2 हजार 101 मतदार, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 52 हजार 634 मतदार, शिरुर विधानसभा मतदारसंघात 4 लाख 39 हजार 276 मतदार, भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 51 हजार 582 मतदार आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 81 हजार 904 मतदार ( Shirur Loksabha Election) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.