Shirur : मराठा कोकणवासिय संघटनेचा खासदार आढळराव यांना जाहीर पाठींबा

एमपीसी न्यूज – यमुनानगर, निगडी, मोरेवस्ती चिखली, रुपीनगर, त्रिवेणीनगरसह भोसरी विधानसभा मतदारसंघातील कोकणवासियांनी शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे, पत्रक संबंधित मराठा कोकणवासिय संघटनेचे अध्यक्ष राम सकपाळ यांनी काढले आहे.

यमुनानगर येथे बुधवारी (दि. 17) संबंधित मराठा कोकणवासिय संघटनेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कार्याध्यक्ष अनिल मोरे, भोसरी विभागीय अध्यक्ष नंदू मोरे, अनंत सकपाळ, प्रदीप गायकवाड, अमृत जाधव, रमेश उत्तेकर, ज्ञानेश्‍वर कदम, शिरीष उत्तेकर, राजेंद्र दळवी, पांडुरंग चव्हाण, दत्तात्रय सकपाळ, तुकाराम साळुंके, विलास महाडिक, मंगेश सकपाळ, नाना उत्तेकर, विनायक कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संघटनेचे सचिव रवींद्र कदम म्हणाले की, खासदार आढळराव पाटील यांचे कोकणातील जनतेचे अतिशय जवळचे नाते असून पिंपरी चिंचवड व पुणे शहरात नोकरी आणि व्यवसायानिमित्त वास्तव्य करणाऱ्या जवळपाच पाच लाख कोकणवासीयांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच मदत केली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांनी आपल्या पतसंस्थेमार्फत वेळोवेळी मदत केली आहे. गौरी-गणपती सणाच्या काळात कोकणातील आम्हा नागरिकांना गावी जाणे सोयीचे व्हावे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच पुणे ते सावंतवाडी दरम्यान हंगामी ट्रेन सोडण्यात येते.

त्याचप्रमाणे सणाच्या काळात जादा एसटी बसेस सोडण्यासाठीही त्यांची मोलाची मदत होते, अशा भावना उपस्थितांनी या बैठकीत व्यक्‍त केल्या. त्याचबरोबर समस्त कोकणवासीयांनी सोमवारी (दि. 29) धनुष्यबाणासमोरील बटन दाबून सहकाऱ्यांचा हात नेहमी पुढे करणाऱ्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मतदान करा, असे आवाहन अध्यक्ष राम सकपाळ, सचिव रवींद्र कदम यांनी केले.खासदार आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व आढळराव पाटील यांनी कोकणवसीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्‍त करताना आपले शालेय शिक्षण कोकणात झाल्याचे आवर्जून सांगितले. आपले आजोळ कोकणातील देवरुख येथील असून आमचा कोकणाशी कायमचा ऋणानुबंध असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like