BNR-HDR-TOP-Mobile

Shirur/Maval: भाजपच्या बैठकीत उमेदवारांबाबत नाराजीचा सूर; दोन दिवसांत जाहीर होणार पुढील भूमिका

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत शिवसेना उमेदवारांबाबत नाराजीचा सूर उमटला. शिवसेनेचे उमेदवार असलेल्या खासदारांनी आजपर्यंत आमच्या आमदारांवर टीका केली. आता त्यांचे काम कसे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, आमदारांनी त्यांची समजूत काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला युतीचा धर्म पाळावा लागेल, असा सबुरीचा सल्ला दिला. याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. परंतु, युतीच्या फॉर्मुल्यानुसार दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे राहिले. शिवसेनेने शिरुरमधून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचार देखील सुरु केला. परंतु, मित्रपक्ष भाजप प्रचारात सक्रिय झाला नाही. युती नसताना शिवसेनेच्या खासदारांनी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यावर प्रचंड टीका केली. मग, आता आम्ही त्यांचे काम कसे करायचे? असा सवाल उपस्थित करत भाजप नगरसेवकांनी काम न करण्याची भूमिका घेतली.

काही नगरसेवकांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली. मात्र, आमदारांनी त्यांची समजूत काढली. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला युतीचा धर्म पाळावा लागेल. याबाबत पक्षश्रेष्टींशी चर्चा केली जाईल. तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचविल्या जातील, असे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी नगरसेवकांना सांगितले. याबाबत दोन दिवसात पुढील भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

HB_POST_END_FTR-A4

.