BNR-HDR-TOP-Mobile

Shirur, Maval: शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी शिवाजीराव आढळराव आणि श्रीरंग बारणे यांना जाहीर 

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची शिरूरची उमेदवारी विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव आणि मावळची विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना आज (शुक्रवारी) जाहीर झाली आहे. शिवसेनेने 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव-पाटील सलग तीनवेळा निवडून आले आहेत. त्यांची ही चौथी निवडणूक आहे. आढळराव निवडणुकीला सज्ज झाले असून त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आढळराव आणि कोल्हे यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

  • मावळ लोकसभा मतदारसंघ सलग दुस-यावेळी शिवसेनेकडे आहे. मावळावर तिस-यांदा भगवा फडकाविण्यासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत. त्यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचिवल्या. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. बारणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने बारणे आणि पवार यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
.

HB_POST_END_FTR-A1
.