BNR-HDR-TOP-Mobile

Shirur : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा गावभेट दौरा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शिरूर मतदार संघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. गावोगावी भेट देण्याचा कार्यक्रम सुरु असून सोमवारी शिरुर येथील माळवाडी, तांदळी गावाला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. 

श्री सावता माळी महाराज यांच्या मंदिराचे काम सुरु आहे. या मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तुम्हाला परत यावच लागणार आहे ते ही मंत्री होऊनच अशा शुभेच्छा ज्येष्ठ नागरिकांनी आढळराव दिल्या. “यावेळी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. आतापर्यंत कोणता खासदार प्रत्येक गावागावांत पोहोचला होता ? असे विचारीत खासदार आढळराव यांनी तुम्ही केलेल्या कामांचा हिशोब द्या असा विरोधकांना टोला लगावला.

HB_POST_END_FTR-A4

.