Shirur News: मिडगुलवाडीच्या सरपंचपदी प्रभावती मिडगुले ; उपसरपंचपदी सतीश इचके

एमपीसी न्यूज – शिरूर तालुक्यातील बेट भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मिडगुलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रभावती सुनील मिडगुले यांची तर उपसरपंचपदी सतीश रामदास इचके यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रामदास बोरुडे यांनी काम पाहिले. ग्रामसेविका शीला साबळे यांनी त्यांना सहाय्य केले.सरपंच पदासाठी प्रभावती मिडगुले आणि उपसरपंच पदासाठी सतीश इचके यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी रामदास बोरुडे यांनी मिडगुले आणि इचके यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या वर्षा मिडगुले, नीता कोळेकर, संध्या मिडगुले, देवू मिडगुले, राहुल मिडगुले आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते महादू होनाजी तांबे, माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष ,माजी सरपंच कैलास मिडगुले, माजी सरपंच सुनील मिडगुले, माजी सरपंच गणेश मिडगुले,सामाजिक कार्यकर्ते शरद पोपळे, यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली . तर महादू तांबे, कैलास मिडगुले, चेअरमन बाळासाहेब मिडगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मिडगुले यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच तसेच सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ह.भ.प.पोपटमहाराज मिडगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान मिडगुले, विष्णू मिडगुले, ज्ञानेश्वर गाजरे, काळूराम गाजरे, भक्तीराम गाजरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल मिडगुले तंटामुक्तीचे उपाध्यक्ष बाळासाहेब मिडगुले, माजी उपसरपंच किसन मिडगुले , माजी उपसरपंच मुकुंद मिडगुले, दत्तात्रेय शिवले, विठ्ठल मिडगुले, सा.का.बबन मिडगुले, सा.का सागर शिवले,ग्रामपंचायत सेवक मिनिनाथ मिडगुले, भारताच्या संरक्षण खात्यातील अधिकारी संदीप मिडगुले, भाऊसाहेब मिडगुले , भीमा मिडगुले ,श्रीहरी मिडगुले, हरी मिडगुले सामाजिक कार्यकर्ते संतोष बाबुराव मिडगुले,किरण मिडगुले, लक्ष्मण शिवले, सा.का. रामदास शिवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच प्रभावती मिडगुले यांना माहेरी त्यांचे वडील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम लांडगे मास्तर यांचा समाजकार्याचा वसा आणि वारसा लाभलेला आहे. प्रभावती मिडगुले यांना २००६ साली जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराने मिडगुलवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

निवडीनंतर प्रभावती मिडगुले म्हणाल्या की, सर्वांना बरोबर आणि विश्वासात घेऊन गावातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. मिडगुलवाडी आदर्शग्राम बनविण्याचा संकल्प आहे. गावातील रस्ते, वीज ,पाणी ,आरोग्य सेवेस प्राधान्यक्रम दिला जाईल. महिला आणि युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.