Shirur News : ‘युवान’च्या वैद्यकीय उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे  : खासदार डॉ. अमोल कोल्हे 

एमपीसीन्यूज :    पिंपरी चिंचवड येथील अवघ्या 16 महिन्यांचा युवान रामटेककर याला ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोपी’ हा दुर्मिळ आजार झाला आहे. युवानच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत 22 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी युवानच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत करावी, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. 

_MPC_DIR_MPU_II

याबाबत डॉ. कोल्हे म्हणाले, युवान रामटेककर याला ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोपी’ हा दुर्मिळ आजार झाला आहे.  त्याच्या आई-वडिलांनी  माझी भेट घेतली. आज लहानग्या युवानला हातात घेताना मी अक्षरश: भावनाविवश झालो होतो. युवानच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत 22 कोटी रुपये इतकी आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे  मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे यावे.   मी लोकसभेत भाषण करताना याच युवानचा संदर्भ देत दुर्मिळ आजारावरील उपचारांसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी अशी विनंती केली होती. युवानला लवकरात लवकर उपचार मिळावे व तो बरा व्हावा, ही आई जगदंबा चरणी प्रार्थना.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.