Shirur: छत्रपती उदयनराजे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच शिवसेना सोडली -डॉ. अमोल कोल्हे 

छत्रपतींच्या गादीशी कधीच बेईमानी करणार नाही

एमपीसी न्यूज – साता-यातून छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार का? असे शिवसेनेकडून मला विचारण्यात आले होते.  त्याचक्षणी मी उत्तर दिले. छत्रपतींच्या गादीशी बेईमानी होणार नाही. उदयनमहाराजांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच शिवसेना सोडल्याचा गौप्यस्फोट शिरुर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. 
राजगुरुनगर खेड येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची आज (शनिवारी)सांगता झाली. या सांगता सभेत डॉ. कोल्हे यांनी शिवसेना सोडल्याचा खुलासा केला. सातत्याने विचारुन देखील डॉ. कोल्हे यांनी शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले नव्हते. आज मात्र त्यांनी कारण सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वी उदयनराजे महाराज हे डॉ. कोल्हे यांच्या प्रचारासाठी येणार होते. परंतु, साता-याचे शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. त्यामुळे उदयनराजे यांना सभेला येता आले नाही.

  • त्यावरुन सोशलमिडीयावर फोटो व्हायरल केले जात होते. ट्रोल केले जात होते. याबाबत बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, “मी प्रामणिकपणे सांगतो. शिवसेनेने मला विचारले होते. आज सगळे येऊन सांगतात. अभिनेता कशाला हवा…अभिनेता कशाला हवा. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो. आज तुम्ही विचारताय अभिनेता कशाला हवा. मग तुम्हीच मला विचारले होते”
“साता-यातून छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार का?, हा प्रश्न मला शिवसेनेकडून विचारला होता. त्याचक्षणी मी उत्तर दिले. छत्रपतींच्या गादीशी बेईमानी होणार नाही” उदयनराजे महाराज यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच शिवसेना सोडल्याचे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.