BNR-HDR-TOP-Mobile

Shirur : शिवाजी महाराजांवरील डॉ. अमोल कोल्हे यांचे बेगडी प्रेम; शिवसेनेचा आरोप 

1,057
PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरील शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रेम बेगडी आहे. त्यांनी ऐतिहासिक पन्हाळगडावर एका चित्रपटासाठी सन 2016 मध्ये ‘प्रेमगीता’चे चित्रिकरण केल्याचा आरोप करत याप्रकरणी कोल्हे यांनी माफी मागावी अशी मागणी, शिवसेनेच्या महिला आघाडीने केली आहे. 
शिवसेना महिला आघाडीची आज (शुक्रवारी)आकुर्डीत पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेत्या आशा बुचके, जुन्नर पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण, महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख विजया शिंदे, जिल्हासंघटक श्रद्धा कदम, माजी सभापती संगिता वाघ, ज्योती आरगडे, वेदश्री काळे उपस्थित होत्या.
  • सुलभा उबाळे म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी  पन्हाळगडावर वास्तव्य केले होते. या किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा आले तेव्हा एक हजार सुवर्णफुलांनी महाराजांचे मावळ्यांनी स्वागत केले होते. अशा या पवित्र पन्हाळगडावर डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठी टायगर या चित्रपटासाठी सन 2016 मध्ये ‘प्रेमगीता’चे चित्रिकरण केले आहे” तसेच पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीपरणे चित्रिकरण केल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे.
पवित्र पन्हाळगडावर प्रेमगीताच्या केलेल्या चित्रिकरणाला आमचा आक्षेप असून शिवसेना महिला आघाडी डॉ. कोल्हे यांचा जाहीर निषेध करत आहे. चित्रिकरणासंदर्भात डॉ. कोल्हे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी. जे नाही आहे ते दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही उबाळे म्हणाल्या.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3