Shirur : “विलास लांडे यांना तेव्हा अपयश आले, आता मात्र… अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

एमपीसी न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Shirur ) अजून वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. मात्र असं असलं तरीही आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून शिरूर लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे आगामी निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत अशा चर्चांना देखील सुरुवात झाली. आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. याविषयी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना आज विचारले असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Manchar : पाय घसरून पडलेल्या मुलीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या

अजित पवारांनी विलास लांडे यांच्या विषयी प्रतिक्रिया देताना म्हटले, “विलास लांडे एके काळचे आमच्या पक्षाचे आमदार आहेत. त्यांना मी महापौर केले होते. त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली होती. त्यावेळेस त्यांना अपयश आले होते. आता मात्र त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, काही आखणी केली असेल. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा असेल. मात्र, हा प्रश्न आमच्या घरातला आहे. सर्वात आधी महाविकास आघाडीतील सर्वच (Shirur ) पक्षांना कोणत्या आणि किती जागा जातील हे ठरेल. त्यानंतर ज्या जागा आमच्या वाट्याला येतील तेव्हा आम्ही उमेदवार ठरवू.

दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. लोकसभेसाठी विलास लांडे यांनी देखील दाबा ठोकला असून त्यासाठी मतदारसंघात भावी खासदार म्हणून त्यांच्या नावाने फ्लेक्सही झळकत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.