Shirur : डीजेच्या तालावर नवरदेवाची मिरवणूक पडली महागात, वर आणि वधुपित्यासह 25 जणांवर गुन्हा

Violation of the Collector's instructions at the wedding ceremony at Morachi Chincholi; The bride and groom, along with the bride and groom, were charged

एमपीसी न्यूज : जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभासाठी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करीत डीजेच्या तालावर नवरदेवाची मिरवणूक काढल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी वर पिता आणि वधुपित्यासह एकूण 20 ते 25 वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल केला. मोराची चिंचोली ( ता. शिरूर ) येथे शनिवारी ( दि. २६) ही कारवाई करण्यात आली.

सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट गडद होत आहे. कोरोचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अनेक निर्बध लागू केले आहे.

लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींना उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्नात मास्क व सॅनिटायझर वापरणे , सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी बंधनकारक केले आहे.

असे असताना मोराची चिंचोली येथे एका लग्न समारंभासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच या लग्नात वऱ्हाडी मंडळी विना मास्क व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता वावरताना आढळून आले. शिवाय डीजेच्या तालावर कर्णकर्कश्य आवाजात नवरदेवाची मिरवणूकही काढण्यात आली.

या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकाराची शिरूर पोलिसांनी गंभीर दाखल घेत लग्न समारंभातील 20 ते 25 वऱ्हाडी आणि वर व वधु पित्यावर गुन्हा दाखल केला, अशी माहिती शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.