BNR-HDR-TOP-Mobile

Shirur : विकासकामांच्या जोरावर आढळराव पाटील विक्रमी मतांनी विजयी होणार- मुख्यमंत्री 

एमपीसी न्यूज – विकासकामांच्या जोरावर शिवाजीराव आढळराव पाटील हे विक्रमी मतांनी विजयी होतील असा आत्मविश्वास आज, मंगळवारी शिक्रापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्रापुरात खासदार आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 
यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, महेश लांडगे, शरद सोनवणे, योगेश  टिळेकर, अॅड. धर्मेंद्र खांडरे, अनिल काशीद, भगवान शेळके, पांडुरंग कराटे आदी उपस्थित होते.
  • मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या दोन टप्प्यातील मतदान लोकांनी महायुतीला भरभरून दिलय. पहिल्या दोन टप्प्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुपडा साफ केलाय. बारामती हलली आहे. पवार साहेबांना हवा कोठे चाललीय हे नीट समजते. ओपनिंग बॅटसमन नरेंद्र मोदीची गुगली पाहिली. त्यामुळे ते आता मैदानात उतरले नाहीत. बारावा खेळाडू म्हणून पेव्हिलियन मधून मॅच पहातो असे सांगून पवार साहेबांनी यु टर्न घेतला आहे, असा टोला त्यांनी लगावला.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3