Chinchwad News : शिव चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

0

एमपीसी न्यूज – श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वाल्हेकरवाडी येथे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवजयंती दिवशी (शुक्रवारी, दि. 19) पार पडला.

शिव चषक क्रिकेट स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले. या स्पर्धेसाठी 4 पारितोषिक ठेवण्यात आले. यश कलाटे क्रिकेट क्लब वाकड संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. आर सी क्रिकेट क्लब लोहगावने दुसरा,  अक्षय चव्हाण क्रिकेट क्लब वाल्हेकरवाडी या संघाने तिसरा तर तिरंगा क्रिकेट क्लब चिंचवड या संघाने चौथा क्रमांक पटकावला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून उपांत्यपूर्व फेरीला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आमदार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शेखर चिंचवडे, तानाजी वाल्हेकर, संदीप चिंचवडे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक कल्याण विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, नथुशेठ वाल्हेकर, तुकाराम वाल्हेकर, विजय काळभोर, अशोक भालके, राजाभाऊ चिंचवडे, संदीप भालके, सुनील वाल्हेकर, युवराज वाल्हेकर, माऊली वाल्हेकर, जितेश वाल्हेकर, बाजीराव वाल्हेकर, वसंत ढवळे, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

धनंजय वाल्हेकर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली. स्पर्धेचे नियोजन अजिंक्य वाल्हेकर, अभिषेक वाळके, गिरीश भोंडवे, दुर्गेश सुर्वे, प्रशांत शिंदे, सुरज वाल्हेकर, बाबु नढे, अमर तायडे, महेश हाडमोडे, तुषार जाधव, तेजस चिकने, शैलेश चव्हाण, सचिन यादव यांनी केले. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कांबळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment