shiv jayanti News : कचरा वेचक महिलांच्या सन्मानातून कृतिशील शिवजयंती साजरी

यशश्री फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

0

एमपीसीन्यूज : यशश्री फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांच्या संकल्पनेतून यंदा कृतिशील शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या कचरा वेचक महिलांचा साडी, मास्क, आयुर्वेदिक औषधी वनस्पती देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

बारामती कचरा डेपो येथे जाऊन यशश्री फाऊंडेशनच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.

बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शिव वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे शहरप्रमुख ॲड. विशाल बर्गे यांनी शिवकाळातील कायदा -व्यवस्था, शासन तसेच महिलांविषयीच्या धोरणांची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

यशश्री फाऊंडेशनच्या आरती तावरे, धनश्री भरते, स्वाती बाबर, शोभा मांडके व इतर महिला पदाधिकारी यांनी कचरा वेचक महिलांना साडी वाटप केले. त्यावेळी ॲड. सुप्रिया बर्गे यांनी या महिलांच्या कायदेविषयक अडचणी समजून घेतल्या. तसेच सामोपचाराने त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

नगरसेवक अतुल बालगुडे, हेमंत नवसारे यांच्या हस्ते आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे वाटप करण्यात आले. तसेच शिव ज्योती पतपेढीतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.