dasara melava : दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईला रवाना

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी पुण्यातून शेकडो शिवसैनिक रवाना झाले. या दोन्ही मेळाव्यातून शिवसैनिकांना काय मार्गदर्शन मिळणार याकडे लक्ष लागले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच या गटाचा मेळावा होत आहे. तर, आता गद्दारांना थारा नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

या दोन्ही मेळाव्यासाठी दोन्ही गटांतर्फे जोरदार पुण्यातून आज शक्तिप्रदर्शन करण्यात आले. एसटी बरोबरच खाजगी बसेसमधून शिवसैनिक रवाना झाले. मागील अनेक महिन्यांपासून या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू होती. शिंदे आणि ठाकरे दोन गट निर्माण झाल्यामुळे त्याचे पुण्यातही पडसाद पाहायला मिळाले आहे. खरी शिवसेना कोणाची हे प्रकरण न्यायालयात आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगापुढे प्रकरण ठेवले आहे. सध्या शिंदे गटाची चांगलीच चालती आहे. या गटात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.