Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघातात निधन

एमपीसी न्यूज : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे भीषण अपघातात निधन झाले. आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथेच त्यांना मृत घोषित केले.

लोकसत्ता या वृत्तपत्रातील माहितीप्रमाणे, विनायक मेटे (Vinayak Mete) आपल्या सहकारी आणि बॉडीगार्डसह मुंबईच्या दिशेने येत असताना त्यांच्या कारला मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिली. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली.

आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.