MLA Tanaji Sawant : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय पेचप्रसंगाचे रंग बदलू लागले आहेत. धमकीनंतर प्रकरण आता हिंसेकडे वळत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. याशिवाय जवळपासच्या दुकानांचीही तोडफोड करण्यात आली. शिवसैनिकांनी कार्यालये आणि दुकानांच्या भिंतींवरही देशद्रोही लिहिले. तानाजी सावंत सध्या गुवाहाटीला शिंदेंसोबत आहे. तत्पूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी ‘शिवसैनिक भडकले तर आग लागेल’, असे वक्तव्य केले होते.

‘शिवसैनिक भडकले तर आग लागेल’ – 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन चर्चा करावी, असे वक्तव्य केले होते. गुवाहाटीमध्ये राहिलेले अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत आणि रात्री १० आमदारांशी चर्चा केली, असेही ते म्हणाले. पुढे त्यांनी धमकीवजा स्वरात शिवसेनेला कोणीही हायजॅक करू शकत नाही, पैशाच्या जोरावर पक्ष कोणी विकत घेऊ शकत नाही आणि शिवसैनिकांचा रोष ओढवला तर आगपाखड होईल, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा नवा गट – नाव ठेवणार का ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’???

एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून कुटुंबाच्या सुरक्षेची केली मागणी 

शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant) यांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, महाविकास आघाडी सरकारने बंडखोर आमदारांची सुरक्षा काढून घेतली आहे, हे चुकीचे आहे. त्यांनी पुढे लिहिले की, आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.