BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कसब्यात शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ

एमपीसी न्यूज – शिवसेना – भाजपची युती होणार तेव्हा होणार, त्यापूर्वीच शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून प्रचाराचा नारळ फोडला.
या मतदारसंघातून गिरीश बापट यांनी 25 वर्ष प्रतिनिधित्व केले. बापट खासदार झाल्याने हा मतदारसंघ मोकळा झाला आहे. खासदारकीचा निवडणुकीत शिवसेना सातत्याने भाजपचे काम करते. त्यामुळे यावेळी कसबा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी धनवडे यांनी केली. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन धनवडे यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3