Pimpri : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात स्थापन होत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीनही पक्षाच्या युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीत जल्लोष केला.

पिंपरी येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौकात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी एकत्रीत जल्लोष साजरा केला. नागरिकांना पेढे भरवीत व आनंद व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.  शिवसेनेचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, सोनियाजी जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद, अजितदादा जिंदाबाद, उध्दव साहेब जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते इम्रान शेख, रामदास मोरे, धनाजी तांबे, मुवाज मुजावर , जुनेद बादशहा,  हुमेद शेख, संतोष भालेराव, सैफ शेख, राशीद सैय्यद, जावेद शेख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासिर चौधरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, एन एस यु आय चे शहरअध्यक्ष डाॅ. वसीम इनामदार, माजी अध्यक्ष निखिल भोईर, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अनिल सोनकांबळे,अक्षय उपरे, युनूस बागवान, सैज्जाद शेख, शिवसेने चे रुपेश कदम ज़िल्हा समन्वयक, जितेंद्र ननावरे,सुरज लांडगे ज़िल्ल्हा युवा आधिकारी, कुणाल जगनाडे विधानसभा प्रमुक युवासेना, अभिजीत गोफन विधानसभा प्रमुख हे सर्व उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.