Pimpri : शिवसेनेतर्फे मंगळवारी ‘प्रथम ती’ या संकल्पनेवर महिलांचा मेळावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने ‘‘प्रथम ती’’ ही संकल्पना घेऊन उद्या (मंगळवारी) महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.

आकुर्डीतील खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता होणा-या मेळाव्यात महिलांचे पंचशक्ती संकल्प यामध्ये शिक्षण, सुरक्षा, समता, स्वास्थ्य आणि स्वावलंबन या विषयांवर आमदार डॉ. मनीषा कायंदे तसेच वीणा भागवत, नगरसेविका प्रविणा मोरस्कर या मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर व पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.