Mumbai: मुंबई पोलिसांवर भरवसा नसेल तर सुरक्षा सोडून द्या, शिवसेनेने अमृता फडणवीसांना सुनावलं

Shiv Sena slams Amruta Fadnavis for criticizing Mumbai police ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन फिरता आणि त्यांच्यावरच असे आरोप करता?’ असा सवाल केला.

एमपीसी न्यूज – सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवल्यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधताना मुंबईतील सुरक्षिततेवर व पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर शिवसेनेने अमृता फडणवीस यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘मुंबई पोलिसांवर भरवसा नसेल तर सुरक्षा कवच सोडून द्या,’ असा टोला युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी सोमवारी (दि.3) एक ट्विट केले. ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने केला जात आहे ते पाहता मुंबईने माणुसकी गमावण्यासारखे वाटते. निष्पाप व स्वाभिमानाने जगणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नसल्याचे ट्विट त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला.


अमृता फडणवीस यांच्या या ट्विटला वरुण सरदेसाईंनी प्रत्युत्तर दिले. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन फिरता आणि त्यांच्यावरच असे आरोप करता?’ असा सवाल केला. ‘मुंबई पोलिसांवर भरवसा नसेल तर हे सुरक्षा कवच सोडून द्या,’ अशा शब्दांतही त्यांनी त्यांना सुनावले.

तीन महिन्यांपूर्वी जेव्हा सगळे घरी घाबरुन बसलेले होते. तेव्हा हेच पोलीस रस्त्यावर आपल्यासाठी उतरले होते. गरज पडल्यावर त्यांच्याकरिता टाळ्या, थाळ्या आणि दिया. आता बिहार निवडणूक आली की शिव्या, अशा शब्दांत सरदेसाई यांनी समाचार घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.