Bhosari News : इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे भोसरीत आंदोलन

एमपीसीन्यूज : इंधन दरवाढीविरोधात आज शिवसेनेच्या वतीने राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने भोसरी, स्पाईन चौक येथे बैलगाडी तसेच गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, युवा सेनेचे कुणाल जगनाडे, कुणाल तापकीर, दत्ता भालेराव, राहुल भोसले, कृष्णा वाळके, विश्वनाथ टेमगिरे, सतीश मरळ, नितीन बोंडे, संदीप टोके, परशुराम आल्हाट,अविनाश लोणारे, संजय गाढवे, रमेश पाटोळे, सहदेव चव्हाण, प्रकाश जाधव, आशा भालेकर, रूपाली अल्हाट, सुनंदा कदम, ऋषिकेश जाधव, गोविंद तांबवडे, दयानंद साठे, किसन शेवते, बापू ढेकळे, विश्वास शिर्के, पवन ढगे, सुभाष थोरवे, राज कदम, अनंत हिंगे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.