Pimple Saudagar : ‘shivade i am sorry’चे फलक लावणारा प्रेमवीर कोण ? 

एमपीसी न्यूज – उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात  ‘shivade i am sorry’ असा मजकूर लिहिलेले फळक झळकले आहेत. आज (शुक्रवारी) पहाटेच्या दरम्यान हे फलक लावले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे फलक पिंपळेसौदागर परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत. फलक नेमके कोणी लावले आहेत. हे अजून समोर आले नाही.  

पिंपळेसौदागर या परिसरात उच्चभ्रू वसाहतींची संख्या अधिक आहे. संगणक अभियंते या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर  ‘shivade i am sorry’ असा मजकूर असलेले फलक लावले आहेत. सुमारे 14 ते 15 फलक लावले आहेत. हे फलक चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणत्या प्रेमविराने हे फलक लावले आहेत, या चर्चेला उधान आले आहे.

दरम्यान, फलक कोणी लावले आहेत, हे अद्याप समोर आले नसून परिसरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासले जात असल्याचे, स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.