Maval : आंदर मावळात शिवजयंती उत्साहात ; आरोग्य शिबिराद्वरे नागरीकांची मोफत तपासणी

एमपीसी न्यूज – आंदर मावळातील टाकवे, माऊ, वडेश्वर, भोयरे, कशाळ, घोणशेत या गावामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत  शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोहगडावरुन ज्योत प्रज्वलित करून जय शिवाजी जय भवानी चा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात गावांमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करुन मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, टाकवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया मालपोटे, उपसरपंच रोहिदास असवले, बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक शिवाजी असवले, संचालक भूषण असवले, पोलीस पाटील अतुल असवले, माजी उपसरपंच अविनाश असवले, आंदर मावळ भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष काळूराम घोजगे, उद्योजक अनिल असवले, उत्सव समितीचे खजिनदार उल्हास असवले, व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष सोमनाथ असवले, टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे तज्ञ संचालक सचिन असवले, माजी चेअरमन विकास असवले, उद्योजक विकास असवले आदी मान्यवर उपस्थित होते.

टाकवे बुद्रुक  येथील शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर, महिलांसाठी होम मिनिस्टर, तसेच लहान मुलांसाठी डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आरोग्य शिबीरामध्ये नेत्रतपासणी, ह्रदयरोग, किडनी विकार, रक्तातील साखर, ब्लड प्रेशर, ईसीजी तपासणी रक्त लगवी तपासणी त्याच बरोबर विशेषत कोरोना व्हायरस रोगाबाबत मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये दिडशे ते दोनशे लोकांनी लाभ घेतला.

होम मिनिस्टरमध्ये सीमा असवले, कामिनी पिलाणे, दुर्गा जगताप, पुनम असवले, योगीता असवले यांनी बक्षिसे मिळवली तर सोलो डान्स स्पर्धेत तनिष्का कदम, राणी भिलारे, पुजा जाधव यांनी क्रमांक पटकावले. ग्रुप डान्स मध्ये असवले स्कूल टाकवे, न्यु इग्लिश स्कूल टाकवे, जिल्हा परिषद शाळा टाकवे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.

खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेता महेश उर्फ बंटी दत्तात्रय असवले यांचा मान्यवरांच्या हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन टाकवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व मंडळाचे संस्थापक स्वामी जगताप, संचालक दिलीप आंबेकर, अध्यक्ष प्रदीप मोढवे, उपाध्यक्ष रोहीदास खुरुसुले,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष  योगेश मोढवे, बाबाजी असवले, संभाजी धामणकर, लक्ष्मण कुटे आदींनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी ग्रा.सदस्य नवनाथ आंबेकर, संचालक दिलीप आंबेकर यांनी केले.माजी उपसरपंच स्वामी जगताप यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.