BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरीत एक गाव एक शिवजयंती उत्साहात

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप न घेता सलोख्याने १२ दिवस शिवजन्म महोत्सव पिंपरीगावात साजरा करण्यात आला.

शिवजयंती निमित्त दररोज पिंपरीगाव येथील प्रत्येक मंडळात सायंकाळी शिवव्याखाने ठेवण्यात आली होती. रूग्णांना अन्न फळवाटप करण्यात आले. तसेच आज दि. 23 मार्चला भव्यदिव्य मिरवणूक शगुन चौकापासून पिंपरीगावापर्यंत काढण्यात आली. या मिरवणूकीत विशेष करुन पंजाबी भांगडा नृत्य, राजस्थानी नृत्य, ढोल ताशा खेळ, महाराष्ट्रीयन ढोलपथक, लहान मुलाचे स्केटींग, मल्ल खांब यांचा समावेश होता. शिवरायाची गाणी वाजवत मोठ्या दिमाख्यात भगवे फडकवत डिजेच्या आवाजात ही मिरवणूक होती. अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सर्व मतभेद विसरुन शिव-शंभु भक्त, गावकरी, महिला, जेष्ठ नागरिक, तरुण मुले, वर्गणीदार, माजी पदाधिकारी, सर्व पक्षीय नेते मंडळी, सर्व मंडळे, यांनी आवर्जुन सहभाग घेतला.


महोत्सवांतर्गत आरोग्य शिबिर, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, वायसीएम रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, भोसरीतील अंधशाळेस, चिंचवडमधील गुरुकुलम अनाथ आश्रमास व गा-ेशाळेस मदतनिधी, महाशिववंदना व स्वच्छता अभियान उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगदंब प्रतिष्ठान, ज्योती मित्र मंडळ, भारत युवक विकास परिषद, शिवालय मित्र मंडळ, दीप मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, भीमज्योत मित्र मंडळ, शंभू प्रतिष्ठान, जय भवानी मित्र मंडळ, स्वराज्य प्रतिष्ठान, शिवशक्ती मित्र मंडळ, शिवांजली मित्र मंडळ, समर्थ हनुमान मित्र मंडळ, पवना मित्र मंडळ, शिवछत्रपती मित्र मंडळ, शिवसाम्राज्य मित्र मंडळ, लोकमान्य डायमंड मित्र मंडळ, अमरदीप मित्र मंडळ, अभिमन्यू मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, मित्र सहकार्य मित्र मंडळ, जोग महाराज प्रासादिक दिंडी, दक्षिणमुखी श्रीहनुमान मंदिर, श्री भैरवनाथ तालीम, श्री सावता महाराज मंदिर समिती, चैतन्य कानिफनाथ सेवा ट्रस्ट, संकल्प मित्र मंडळ, शिवदत्त मित्र मंडळ, आवाज मित्र मंडळ, शिवाई मित्र मंडळ, सावली ग्रुप, भगतसिंग मित्र मंडळ, औदुंबर सेवा प्रतिष्ठान, गोठा प्रतिष्ठान, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, अर्जुन मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, अभिमन्यू मित्र मंडळ, सुदर्शन मित्र मंडळ, अजिंक्‍य मित्र मंडळ, राजेशाही ग्रुप, ईगल मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ पिंपरी, सिंधी समाज, पिंपरी गुरुद्वारा आदि मंडळांनी सहभाग घेतला आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.