Shivajinagar Crime News: विना मास्क वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालणाऱ्या दोघांना अटक

0

एमपीसी न्यूज – विना मास्क दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सायंकाळी वीर चापेकर चौकात ही घटना घडली. 

सौरभ लहू उमेर (वय 20) आणि मयूर धनंजय चतुर (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई बालाजी बाबुराव पांढरे (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी पांढरे हे शिवाजीनगर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते वीर चाफेकर चौकात कर्तव्यावर होते. यावेळी दुचाकी आलेले सौरभ आणि मयूर यांनी मास्क घातलेल्या नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवले आणि पावती करण्यास सांगितले.

परंतु आरोपींनी पांढरे यांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर गाडीने धक्का मारून पांढरे यांना खाली पाडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील इतर पोलिसांनी दोघांनाही पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.

त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.