BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : शिवाजी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे श्रमदान

एमपीसी न्यूज – देहुरोड येथील शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज देहुरोड, येथील २००४ – ०५ चे एस.एस.सी.बोर्ड चे माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन, श्रमदान केले. 

माजी विद्यार्थी किरण गवळी यांनी मुख्याध्यापिका धनश्री जाधव याची भेट घेतली. यावेळी मुख्याध्यापिका यांनी विद्यालयच्या आवारात, मैदानात वाढलेल्या गवतामुळे येणा-या समस्यांसंदर्भात सांगितले. माहिती मिळाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकञ येऊन शाळेतील मोठ मोठे उगवलेले गवत स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने काढले.

याठिकाणी जुन्या इमारतीत बालवाडी ते इयत्ता चौथीचा वर्ग असतो. विद्यार्थी येथे खेळताना या गवतात चेंडू अथवा फुटबॉल जातो. विद्यार्थी फुटबॉल आणण्यासाठी येथील गवतात जातात. तेथे उंदीर, साप व विंचू असण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना धोका संभवतो. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने येथील गवत काढले. यावेळी सुमारे २५ ते ३० माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून श्रमदान केले आहे.

यावेळी दीपक गायकवाड, किरण गवळी, शशिकांत वि.चव्हाण, विकास कांबळे, समीर भालेराव, संदीप तरस आदी माजी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

 

Advertisement

HB_POST_END_FTR-A3