dehugaon : जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यालयाचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत देहूरोड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिवाजी विद्यालयाने घवघवीत यश मिळविले.

14 वर्षे मुले – फ्रीस्टाईल – 38 किलो- दिनेश मालपोटे( प्रथम क्रमांक)- प्रणव भोईर (तृतीय क्रमांक)

44 किलो- साहिल मोरे(द्वितीय क्रमांक), 48 किलो- दयानंद जाधव (प्रथम क्रमांक), विराज घेरडे (द्वितीय क्रमांक)

17 वर्षे वयोगटातील 45 किलो वजनगटात प्रणव सावंत ( प्रथम क्रमांक), 51 किलो – रितेश बनगर( तृतीय  क्रमांक), 55 किलो- सोहम मोरे( द्वितीय क्रमांक)

17 वर्षे वयोगटात ग्रीकोरोमन  मध्ये 45 किलो वजनगट – अथर्व आल्हाट ( द्वितीय क्रमांक), 92 किलो- वजनगट- सोहम गुरव (प्रथम क्रमांक) यांनी घवघवीत यश मिळविले.

यापैकी दिनेश मालपोटे, दयानंद जाधव, प्रणव सावंत, सोहम गुरव यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक राजेंद्र काळोखे, मनिषा कठाळे यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य पी.टी. थोरात, उपप्राचार्य बाळासाहेब शेंडे पर्यवेक्षक संजना आवारी मॅडम यांंनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.