Shivajinagar Fire News : न. ता. वाडी बस डेपोतील बसला आग ; सुदैवाने दुर्घटना टळली

0

एमपीसी न्यूज : नरवीर तानाजी वाडी बसडेपोमध्ये उभ्या असलेल्या बस क्रमांक 8177 मध्ये शॉर्टसर्किटमुळे दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. सुदैवाने बसमध्ये चालक, वाहक आणि प्रवासी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आग लागल्याची वर्दी मिळताच 15 मिनीटांमध्ये कसबा अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहोचले. आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन जवान सुनिल नाईकनवरे, गायकवाड, कुंभार, शेख यांनी ही कामगिरी केली.

_MPC_DIR_MPU_II

सुदैवाने बसडेपोमध्ये प्रचंड गर्दी होती पण जीवितहानी झाली नाही. आग लागलेल्या बसमधून प्रचंड धुराचे लोट येत होते. डेपोत काही अंतरावरच डिझेल पंप आहे, पण आग आटोक्यात आणल्यामुळे धोका टळला आहे.

बसमधील वायरींगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.