Shivajirao Adharao Patil : आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतली 25 कोटींच्या कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – लांडेवाडी येथे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी व शिवसेना कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे ग्रामपंचायत ते आढळराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत जोरदार स्वागत केले.

आपल्या भेटी दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी आढळराव पाटील यांच्याबरोबर जेवण केले. तसेच आढळराव पाटलांनी 25 कोटींची कामे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मंजूर करुन घेतली. शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी ग्रामीण विकास, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,पीएमआरडीए,सामाजिक न्याय यासह अन्य योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सुचविलेल्या 25 कोटी रुपये निधीच्या कामांबाबत तसेच अन्य महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच विशेष बैठक मंत्रालयात आयोजित केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.