BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : समाजातील विविध घटकांमध्ये काम करणा-या महिलांना पाठवली शिवबंधनाची राखी

इरफान सय्यद यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – कामगार नेते इरफान सय्यद यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात विविध घटकांमध्ये काम करणा-या सुमारे तीन हजार महिलांना शिवबंधनाच्या राख्या पाठवण्यात आल्या. विविध क्षेत्रात सक्षमपणे काम करून देशाच्या भाग्यविधात्या असलेल्या महिलांच्या रक्षणाचे वचन देऊन इरफान सय्यद यांनी यावर्षीचे रक्षाबंधन साजरे केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील कचरावेचक, भाजी विक्रेत्या, डॉक्टर, नर्स, शिक्षिका, पोलीस, वकील, बांधकाम कामगार, कंपनीच्या महिला कामगार आणि अधिकारी, गृह उद्योजक अशा विविध घटकातील महिलांना इरफान सय्यद यांनी विशेष शिवबंधनाची राखी पाठवली आहे. समाजातील सर्व माता-भगिनींच्या संरक्षणासाठी, त्यांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी आपण कोणत्याही वेळी कटिबद्ध असल्याचे वचन त्यांनी राखीसोबत दिले आहे. अनेक महिला कार्यकर्त्यांनी त्यांना राख्या पाठवल्या आहेत. तर काही महिला-भगिनींनी स्वतः भेटून राख्या बांधल्या.

कामगारांच्या प्रश्नांवर अविरतपणे काम करत असताना महिला सुरक्षा, महिला सक्षमीकरण, महिला शिक्षण याविषयावर देखील इरफान सय्यद काम करत आहेत. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात विजयी पताका फडकावली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या महिला सध्या पुरुषांच्या पुढे एक पाऊल जाऊन काम करत आहेत. घर सांभाळून काम करणा-या महिलांप्रती आदर व्यक्त करावा, तेवढा कमी आहे. महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या पंखांमध्ये आणखी बळ भरण्यासाठी इरफान सय्यद यांनी हा उपक्रम राबवला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3