Shivbhojan Thali : पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.

15 एप्रिल ते 7 जुलै या काळात 1 कोटी 21 लाख 76 हजार 930 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती पाहून राज्य शासनाने निःशुल्क शिवभोजन थाळी योजनेला 14 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 01 लाख 13 हजार 257 थाळ्यांचे वितरण झाले आहे. राज्यात सद्यस्थितीत 1093 शिवभोजन केंद्र सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.