Shiv bhojan Thali News: गुरुवारपासून ‘या’ वेळेतच मिळणार शिवभोजन थाळी

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शिवभोजन केंद्राची वेळ सकाळी 7 ते 11 पर्यंत करण्यात आल्याची माहिती अन्न धान्य वितरण विभागाच्या अ परिमंडळ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. अ परिमंडळ कार्यालयाच्या हद्दीतीतील 11 शिवभोजन केंद्रांवर शिवभोजन थाळीची वेळ बदलण्यात आली आहे. शिव भोजन केंद्राची बदललेली  वेळ उद्यापासून ( गुरुवार) लागू करण्यात येणार आहे. शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सकाळी 7 ते 11 या वेळेत आपापल्या परिसरातील शिवभोजन केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन तावरे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडसह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेन’चे कडक निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्राच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.