Shivdurg Series: शिवदुर्ग मालिका भाग 18 – महाराष्ट्रातील सर्वांत उंच ‘किल्ले साल्हेर’

एमपीसी न्यूज – नाशिक जिल्ह्यातील समृद्ध व संपन्न प्रदेश बागलान. बागलान ही संतांची भूमी आहे. बागलानला ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक लढाया झाल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या या प्रदेशात बागुल राजांनी राज्य केले म्हणूनच या भागाला बागलान असे नाव पडले. अत्यंत पराक्रमी असलेल्या या राजांनी हुमायूँ व आखबर यांचाही पराभव केल्याचा उल्लेख येथे आढळतो. भटक्यांचे नंदनवन असलेल्या या बागलान प्रदेशात महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेर किल्ला वसलेला आहे. 

साल्हेर हा मोसम नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. सर्वात उंच किल्ल्याचा मान असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून  5141 फूट उंच असून हा सर्व परिसर नेत्रदीपक व रमणीय आहे.

संस्कारभारती , पुणे महानगर, सादर करीत आहे शिवदुर्ग मालिकेतील किल्ले साल्हेर!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.