Maval : माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी घेतली शिवभक्तांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

मावळात शिवज्योत घेऊन येणाऱ्या टेम्पोला झालेल्या अपघातात दोन शिवभक्तांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : शिवजयंती निमित्त मल्हार गडावरून मावळात शिवज्योत घेऊन येणाऱ्या टेम्पोला झालेल्या अपघातात सुमारे 35 शिवभक्त जखमी झाले हाेते. (Maval) त्यापैकी दोन शिवभक्तांचा मृत्यू झाला होता. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी शिलाटणे या गावी जाऊन या शिवभक्तांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 10 मार्चला शिलाटणे येथील युवक शिवज्योत आणण्यासाठी मल्हारगड (ता. पुरंदर) येथे गेले होते. शिवज्योत घेऊन परतत असताना ताथवडे येथे पहाटे साडेचार वाजता पाठीमागून आलेल्या भरधाव मालवाहू ट्रकने पायी चाललेल्या शिवभक्तांना आणि त्यांच्या वाहनांना जोरदार धडक दिली होती.

Alandi : माऊली मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन

या अपघातात सुुमारे 35 युवक जखमी झाले होते. तर करण शत्रुघ्न कोंडभर ( वय 22 ) व आर्यन सोमनाथ कोंडभर ( वय 12 ) या दोन शिवभक्तांचे दुर्दैवी निधन झाले.(Maval) त्यामुळे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी शिलाटणे या त्यांच्या गावी जाऊन कोंडभर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.